Saturday, February 6, 2010

संरक्षण आपल्या बिबट्याच

हल्ली रोज टी वी वर एक जाहिरात लगते. वाघाचं एक  छोट पिल्लू  आपल्या आईची वाट पाहत बसलेल असतं . रात्र होते तरी त्याची  आई येत नाही , जंगलात कुठे तरी गोळी जाडल्याचा  आवाज येतो, आणि याच वेळी निवेदक विचारतो की कदाचीत  याची आई घरी येइल की नाही ? प्राणीमित्रच  काय पण आनेकांच्या डोळ्यांच्या कडा  ओलावून सोडणारी  ही जाहिरात किन्व्हा सन्देश. भारतातील वाघ ही देशाची राष्ट्रीय संपत्ति आहे अणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान, मात्र हां अभिमान जागा  होयला आता थोडा उशीर जाला आहे आणि भारतात फक्त १४११ वाघ राहिले आहेत.

महाराष्ट्रात सहजतेने अढळणारा  प्राणी म्हणजे आपला बिबट्या. महाराष्ट्राचा अभिमान, पण ह्या बिबट्या ची देखिल अशीच हत्या केलि जात आहे. काल वर्तमानपत्रात मुंबई पुणे द्रुतगति मार्गावर वहानाची धड़क बसून मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याची  फोटो सहीत बातमी आली आहे.



(पुणे-मुंबई द्रुतगति मार्गावर बउर नजिक मोटारीची धड़क बसून मृत्युमुखी पडलेला २ वर्षाचा बिबट्या०४/०२/2010) 

वास्तविक वाघ मारण्या मधे सामान्य माणसाचा फार मोठा वाटा नसतो. वाघांची  हत्या केलि जाते ती तस्करी च्या उद्देश्याने , पण महाराष्ट्रात बिबट्याची  हत्या सामान्य माणूसच  करत आहे हे ह्या बातमी वरून स्पष्ट आहे. वर्षातून छार पाच वेळl तरी वर्तमानपत्रात बिबट्या गावत शिरल्या ची अणि लोकांनी त्याची हत्या केल्या ची बातमी येते. क्वचीत प्रसंगी एखादा  प्राणी वाचतो ही, पण ते क्वचीतच, अगदी  कमी वेळेला. 

बिबट्याच्या  सुरक्षे ची जवाबदारी ही जितकी सरकारची ची आहे तितकीच आपली प्रत्येकाची आहे कारण हां प्राणी गावात  आणि शहरात ही हल्ली अन्न भक्ष च्या शोधर्थ येऊ लागलेला आहे. त्याची  सुरक्षा आपण आज केलि नाही तर लवकरच वाघंlच्या बाबतीत जी वेळ आपल्या वर आली आहे ती बिबट्याच्या  बाबतीत देखिल येइल.

तेव्हा जागे व्हा आणि बिबट्याचं संरक्षण करा ..... प्रत्येकाने.

No comments: