नव नवे प्रयोग करतच रहायचे आसतात आणि बदलत्या जगात बदलत्या टेकनोलौजी बरोबर आपण देखिल बदलत जायच असतं. मी काही साठी वगैरे ओलांडली नाही आणि बदलत्या technology वगैरेच्या बरोबरीने बदलण्यात मला काही अभिमान नाही कारण that is the need of the day. आमच्या पिढीची ती अगदी प्रर्थमीक गरज आहे. याचा अर्थ आपल्या क्षेत्रात होणारे बदल, येणार्या नव नवीन टेकनोलौजी आणि सिस्टम हे सगळा तर आलच,पण याच बरोबर उद्या ३० - ३५ च्या वयात जनरल मेनेजर च्या ऑफिस मधे बसणार्या व्यक्तीने जर मला ऑरकुट माहित नहीं, फेसबुक माहित नहीं किंवा ट्विट्टर माहित नहीं आणि मायस्पेस माहित नहीं आसा म्हणून चालत नहीं, even that is an equally important part of technology.
मात्र फेसबुक आणि ऑरकुट सारख्या सोशल नेटवर्किंग साईट वरून प्रत्येक जण आपल्या मनातल्या नेमक्या भावना उघड्या करत आसतो, त्या कुणी तरी वाचेल आणि आपल्या बद्दल त्या व्यक्तीला आपल्या बद्दल सहानभूति वाटेल या आशेने. कींवा ज्या व्यक्तीने आपल्याला खुप सुख दिले किंवा खुप दुःख दिले ती व्यक्ति ते वाचेल आणि त्याला काहीतरी फील होइल , आनंद किन्व्हा दुख ...whatever it is...... मात्र ज्या व्यक्तीने हे सगळ वाचाव ती व्यक्ति तर बर्याच वेळेला ते वाचतच नाही , जग मात्र वाचतं आणि स्वत:ची करमणुक करून घेत असतं.
त्याचबरोबर या सगळ्या साईटसचा आजुन एक दुशपरिणाम म्हणजे, कधी तरी आपण खुप आनंदात असतो आणि ऑरकुट वर मित्रांशी चैटिंग करत मस्त बसलेलो आसतो. इतक्यात कुठल्या तरी बिघडलेल्या मित्र मैत्रींणीचा चा अपडेट , साईट वर अपडेट होतो, मग सहजच उत्सुकते पोटी आपण त्या व्यक्तीच्या प्रोफाइल मध्ये जातो, मग थोडेशे फ़ोटो बघीतले जातात, आणि मग कळतं अरे च्यामायला ही/हा खुपच सुखात आहे की. म्हणजे आपल्या बरोबर हा असा वागला , तसा वागला, आपण ते अजुन विसरलो नहीं आणि हा..., ती मैत्री आठवली की अजुन सुधा तुमच्या मानत खरोखरीच गलबल्त्न, पण ती जुनी मैत्री ही त्या व्यक्ती साठी तितकीच महत्वाची असेल अस काही नाही. आणि मग उगाचंच त्या व्यक्तीच्या सुखात आपण आपल्या कलिष्ट विचारांची फोडणी देत बसतो.
हयात अश्या सोशल नेटवर्किंग साइट्सना दोष देणे हा उद्देश्य नाही, वास्तविक ह्या साइट्स ह्या आज आमच्या पिढीच्या रोजच्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहेत आणि रोज कामानिमित्त , कर्मणूकी साठी, ह्या साइट्सच्या नावाप्रमाणे
सोशल नेटवर्किंग साठी रोजच आम्ही ह्या साइट्स वापरतच असतो. फक्त ह्या साइट्स वापरत असताना आपण आपल्या किती भावना उघड्या करतोय किन्व्हा इतरांच्या भवनान मधे किती गुन्तोय याचा विचार नक्कीच व्हावा .
पण अर्थात स्वभावाला अवशध नसतं , आणि शेवटी मज्याशी कोणीही कसा ही वागला तरी मला काहीच फरक पडत नाही आणि मी त्या व्यक्तीला सदिछाच देइन असं वागायला आपण काही महापुरुष नसतो.
No comments:
Post a Comment