Thursday, February 25, 2010

सलाम

कधी कधी आपण स्वत:  मधे इतके गुरफटून जातो की अवती भवति च्या चांगल्या गोष्टीं कड़े आपलं लक्षच नसतं. मग कधी तरी एखादी व्यक्ति असं काही काम करते की आपल्याला खाडकन जाग येते. मग लक्ष्यात येतं की आपल्या काळज्या  किती शुल्लक आहेत. आयुष्यात या छोट्या छोट्या आणि फालतू  काळज्या करत बसण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष्य दिल  की  आपल्या कर्तुत्वला पैलू पडतात. आपली संकुचीत मति खुली होते आणि आपले विचार देखिल बदलतात.

मग त्या विचाराच्या माणसाला त्याच्या कर्तुत्वाला कसल्या ही सीमा राहत नाहित. सगळ्यानचं मन अशी व्यक्ति आपल्या कर्तुत्वाने जिंकुन घेते.

आणि याच  उत्तम उदाहरण म्हणजे या भारतवर्षातील दोन दिग्गज व्यक्तिमत्वे .... अर्थातच भारतरत्न लता मंगेशकर आणि नव नवे विक्रम आपल्या  नावावर नोंदवत जाणारा आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर. लता दीदी जेव्हा गातात तेव्हा त्यांच्या आवाजाला दाद द्येयला आपण कुठल्या देशाचे आहोत, आपण भारतीय आहोत का पाकिस्तानी आहोत, हिन्दू की मुसलमान आहोत हा विचार करणारी व्यक्ति अस्तीत्वात नाही. २५ हजारच्या वर चा समुदाय जेव्हा एखाद्या कार्यक्रमात ए मेरे वतन के लोगो .... ला उभा राहून टाल्या वाजवतो तेव्हा त्या ५० हजार डोळ्यान मधले आश्रू हे फक्त त्या दैवात्वाला वाहिलेली सुमने असतात. 

   लता मंगेशकर

अश्याच प्रकारे काल एक अतुल्य खेळ सादर करून , आपल्या यशस्वी कारकिर्दीत आणखिन एक मानाचा तुरा खोवणारा आपला सचिन. एक दिवसीय अंतरराशट्रीय  कसोटी सामन्यात नाबाद २०० पटकवणारा एकमेव खेळ1डू . २०० वी धाव काढण्यासाठी जेव्हा सचिन धावला तेव्हा उभ्या स्टेडीयम मधले सागले लोक उभे राहून टाल्या  वाजवू लागले. द.अफ़्रीके ला हातातली गेलेली मैच स्पष्ट दिसत होती. मात्र तरीही त्या स्टेडीयम मधल्या प्रत्येक भारतियाच्या बरोबरीने तेथील प्रत्येक द. अफ्रीकन अथवा इतर कोणीही , त्या विश्वविक्रम वीराला मान देण्यासाठी उभा राहिला. हा मान जात, पात  , वर्ण, सीमा या सग्ल्याच्या पलिकडे जाउन फक्त त्या कर्तुत्व्ला आणि त्या खेळ!ला दिलेला मान होता. आणि तो असामन्य खेळ!डू असो व वेडया सारखे टाल्या वजवणारे लोक असोत या सग्ल्यांचा धर्म जात पंथ एकच होता ... आणि तो म्हणजे क्रीकेट  . 

                                एक दिवसीय अंतरराशट्रीय  कसोटी सामन्यात नाबाद २०० धावा काढलेला सचिन तेंडूलकर 

आपल्या सारख्या सामान्य माणसांचे  विचार बदलवण्याची ताकत या व्यक्तीं मधे असते. आणि समाजकल्याणा नावावर राजकारण करणार्या आणि धर्माच्या नावावर जातीय फूट पडणार्या हरामाखोरांच्या कानाखाली दिलेली ही खड़खडीत थोबाडीत असते.




No comments: