Thursday, February 25, 2010

सलाम

कधी कधी आपण स्वत:  मधे इतके गुरफटून जातो की अवती भवति च्या चांगल्या गोष्टीं कड़े आपलं लक्षच नसतं. मग कधी तरी एखादी व्यक्ति असं काही काम करते की आपल्याला खाडकन जाग येते. मग लक्ष्यात येतं की आपल्या काळज्या  किती शुल्लक आहेत. आयुष्यात या छोट्या छोट्या आणि फालतू  काळज्या करत बसण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष्य दिल  की  आपल्या कर्तुत्वला पैलू पडतात. आपली संकुचीत मति खुली होते आणि आपले विचार देखिल बदलतात.

मग त्या विचाराच्या माणसाला त्याच्या कर्तुत्वाला कसल्या ही सीमा राहत नाहित. सगळ्यानचं मन अशी व्यक्ति आपल्या कर्तुत्वाने जिंकुन घेते.

आणि याच  उत्तम उदाहरण म्हणजे या भारतवर्षातील दोन दिग्गज व्यक्तिमत्वे .... अर्थातच भारतरत्न लता मंगेशकर आणि नव नवे विक्रम आपल्या  नावावर नोंदवत जाणारा आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर. लता दीदी जेव्हा गातात तेव्हा त्यांच्या आवाजाला दाद द्येयला आपण कुठल्या देशाचे आहोत, आपण भारतीय आहोत का पाकिस्तानी आहोत, हिन्दू की मुसलमान आहोत हा विचार करणारी व्यक्ति अस्तीत्वात नाही. २५ हजारच्या वर चा समुदाय जेव्हा एखाद्या कार्यक्रमात ए मेरे वतन के लोगो .... ला उभा राहून टाल्या वाजवतो तेव्हा त्या ५० हजार डोळ्यान मधले आश्रू हे फक्त त्या दैवात्वाला वाहिलेली सुमने असतात. 

   लता मंगेशकर

अश्याच प्रकारे काल एक अतुल्य खेळ सादर करून , आपल्या यशस्वी कारकिर्दीत आणखिन एक मानाचा तुरा खोवणारा आपला सचिन. एक दिवसीय अंतरराशट्रीय  कसोटी सामन्यात नाबाद २०० पटकवणारा एकमेव खेळ1डू . २०० वी धाव काढण्यासाठी जेव्हा सचिन धावला तेव्हा उभ्या स्टेडीयम मधले सागले लोक उभे राहून टाल्या  वाजवू लागले. द.अफ़्रीके ला हातातली गेलेली मैच स्पष्ट दिसत होती. मात्र तरीही त्या स्टेडीयम मधल्या प्रत्येक भारतियाच्या बरोबरीने तेथील प्रत्येक द. अफ्रीकन अथवा इतर कोणीही , त्या विश्वविक्रम वीराला मान देण्यासाठी उभा राहिला. हा मान जात, पात  , वर्ण, सीमा या सग्ल्याच्या पलिकडे जाउन फक्त त्या कर्तुत्व्ला आणि त्या खेळ!ला दिलेला मान होता. आणि तो असामन्य खेळ!डू असो व वेडया सारखे टाल्या वजवणारे लोक असोत या सग्ल्यांचा धर्म जात पंथ एकच होता ... आणि तो म्हणजे क्रीकेट  . 

                                एक दिवसीय अंतरराशट्रीय  कसोटी सामन्यात नाबाद २०० धावा काढलेला सचिन तेंडूलकर 

आपल्या सारख्या सामान्य माणसांचे  विचार बदलवण्याची ताकत या व्यक्तीं मधे असते. आणि समाजकल्याणा नावावर राजकारण करणार्या आणि धर्माच्या नावावर जातीय फूट पडणार्या हरामाखोरांच्या कानाखाली दिलेली ही खड़खडीत थोबाडीत असते.




Thursday, February 11, 2010

Save our tigers

This is really a touching ad film I have mentioned earlier in my regional post. Watch it.

Save our tigers




Watch the Ad Film I had been Talking About

Saturday, February 6, 2010

संरक्षण आपल्या बिबट्याच

हल्ली रोज टी वी वर एक जाहिरात लगते. वाघाचं एक  छोट पिल्लू  आपल्या आईची वाट पाहत बसलेल असतं . रात्र होते तरी त्याची  आई येत नाही , जंगलात कुठे तरी गोळी जाडल्याचा  आवाज येतो, आणि याच वेळी निवेदक विचारतो की कदाचीत  याची आई घरी येइल की नाही ? प्राणीमित्रच  काय पण आनेकांच्या डोळ्यांच्या कडा  ओलावून सोडणारी  ही जाहिरात किन्व्हा सन्देश. भारतातील वाघ ही देशाची राष्ट्रीय संपत्ति आहे अणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान, मात्र हां अभिमान जागा  होयला आता थोडा उशीर जाला आहे आणि भारतात फक्त १४११ वाघ राहिले आहेत.

महाराष्ट्रात सहजतेने अढळणारा  प्राणी म्हणजे आपला बिबट्या. महाराष्ट्राचा अभिमान, पण ह्या बिबट्या ची देखिल अशीच हत्या केलि जात आहे. काल वर्तमानपत्रात मुंबई पुणे द्रुतगति मार्गावर वहानाची धड़क बसून मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याची  फोटो सहीत बातमी आली आहे.



(पुणे-मुंबई द्रुतगति मार्गावर बउर नजिक मोटारीची धड़क बसून मृत्युमुखी पडलेला २ वर्षाचा बिबट्या०४/०२/2010) 

वास्तविक वाघ मारण्या मधे सामान्य माणसाचा फार मोठा वाटा नसतो. वाघांची  हत्या केलि जाते ती तस्करी च्या उद्देश्याने , पण महाराष्ट्रात बिबट्याची  हत्या सामान्य माणूसच  करत आहे हे ह्या बातमी वरून स्पष्ट आहे. वर्षातून छार पाच वेळl तरी वर्तमानपत्रात बिबट्या गावत शिरल्या ची अणि लोकांनी त्याची हत्या केल्या ची बातमी येते. क्वचीत प्रसंगी एखादा  प्राणी वाचतो ही, पण ते क्वचीतच, अगदी  कमी वेळेला. 

बिबट्याच्या  सुरक्षे ची जवाबदारी ही जितकी सरकारची ची आहे तितकीच आपली प्रत्येकाची आहे कारण हां प्राणी गावात  आणि शहरात ही हल्ली अन्न भक्ष च्या शोधर्थ येऊ लागलेला आहे. त्याची  सुरक्षा आपण आज केलि नाही तर लवकरच वाघंlच्या बाबतीत जी वेळ आपल्या वर आली आहे ती बिबट्याच्या  बाबतीत देखिल येइल.

तेव्हा जागे व्हा आणि बिबट्याचं संरक्षण करा ..... प्रत्येकाने.

Friday, February 5, 2010

Save the tigers

In the United States a lot of Americans are very curious about India. They have a lot of curious questions to ask about our country. a lot of them are still under an imression that India is place full of dense forests and snakes are a part of our daily life.... (unfortunetely they are not).

Once when i was travelling with a friend in his car, i casually happened to mention that in India we have right hand drive abd he was surprised and the question he asked was.... U HAVE CARS IN INDIA.....
I would not blame the Americans for their knowledge about India. Its not that our country is making a good picture in front of them. American news channel cover the Famins and floods in the remotest part of India showcasing the entire country like an African street. They cover how hundreds of idiots crowd up to visit some stupid baba or devi or gurumaa.. most of the people in this crowd will not even be fully dressed. Their kids will be naked and hungry and the Americans watch it with great interest.

I met a few Guyz who had visited India and they liked it. They Like the natural beauty of Kerala, The ancient forts in Rajastan and are surprised by the crazy life in Mumbai.

But they have the memories of them being cheated, of someone spitting right next to them or of escaping a severe road crash just because someone came drivivg the wrong way.

But there was one thing a lot of americans asked us about and we were proud to answer. and that was about our tigers but unfortunetely we Indians are not worried about their existance. The Government has now become aware but it is important that our people realise the importance. If they dont tigers are soon going to extint. and india will not be the proud owner of such an amazing asset....

Wake up....We have a very few tigers now... Save them.....

Monday, February 1, 2010

 "कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील..... पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.."


                                                                                                                from the internet.................
माज्यापेक्षा हुद्दयाने किन्व्हा वयाने (शक्यतो  हुद्दयानेच) लहान असणारी एखादी व्यक्ति जर मला एखादी अशी वास्तु मागत असेल  ज्यामुले  त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही तरी चांगला  फरक पडेल, आणि दिली काय किन्व्हा नाही दिली काय मला काही विशेष फरक पडणार नाही पण दयेयची की नाही हे ही माज्याच हातात असेल तर मी ती गोष्ट त्या व्यक्तीला देऊन टाकीन  and I will Finish the matter there. कारण छोट्या व्यक्तीला मी काही ही बोलू शकतो, मात्र जर ती छोटी व्यक्ति माज्या बॉस कड़े गेली आणि तिकडून फरमान निघाल तर मी काहीच बोलू शकणार नाही.....

मी त्या व्यक्तीला ही खुश ठेवीन आणि स्वतहाला देखिल.

हे माज़े  विचार नाहीत , हा नुक्ताच होतं असलेला बोध आहे. साध्य मी देखिल अश्या परीस्थितीत सापडलो आहे की मला माज्या जुन्या  कंपनीतून काही हव आहे, जे दिलं काय आणि नाही दिलं काय कंपनी ला विशेष फरक पडणार नाही, पण देत नाहीत. मात्र आज कोण्या  पुणेरी मित्राने कंपनीत  काड़ी केल्यामुले  आता मी  हा प्रश्न वर नेणार असं आमच्या जनरल  मेनेजर पर्यंत पोचलं आहे, आणि आजच सुट्टीवर गेलेल्या माज्या साहेबाला (जून्या) माजी आठवण  आली आणि  त्यांनी मला फ़ोन केला.

त्यामुले  moral of the story is फलतू गोष्टी अन   छोट्या लोकांच्या चुकार डीमांड्स  न पुरवून आपली सुट्टी तरी वाया घालवावी लगते किन्व्हा सतत टेंशन मध्ये तरी रहावं लागतं. त्य्पेक्षा if your subordinate is asking for a rational thing उगाचच आपण काही आडवू  शकतो हे दाखवून स्वताहाचा खोळम्बा करून घेण्यापेक्षा just finish the matter.

आणि हा ही विचार करा की, की कधीतरी ही छोटी व्यक्ति ही मोठी होणार आहे, आणि हा नाही तर....निदान एक वेळ आपण छोटे होता हा तरी कराच....

सोशल नेटवर्किंग साइट्स

नव नवे प्रयोग करतच रहायचे आसतात आणि  बदलत्या जगात  बदलत्या टेकनोलौजी  बरोबर आपण देखिल बदलत जायच असतं. मी काही साठी वगैरे ओलांडली नाही आणि  बदलत्या  technology वगैरेच्या बरोबरीने    बदलण्यात  मला काही अभिमान नाही कारण that is the need of the day. आमच्या पिढीची ती अगदी प्रर्थमीक      गरज  आहे.  याचा अर्थ आपल्या क्षेत्रात होणारे बदल, येणार्या नव नवीन टेकनोलौजी आणि सिस्टम हे सगळा तर आलच,पण याच बरोबर उद्या ३० - ३५ च्या वयात जनरल मेनेजर च्या ऑफिस मधे बसणार्या  व्यक्तीने जर मला ऑरकुट माहित नहीं, फेसबुक  माहित  नहीं किंवा ट्विट्टर माहित  नहीं आणि मायस्पेस  माहित नहीं आसा म्हणून चालत नहीं, even that is an equally important part of technology.

मात्र फेसबुक  आणि ऑरकुट सारख्या सोशल नेटवर्किंग साईट वरून प्रत्येक जण आपल्या मनातल्या नेमक्या भावना उघड्या करत आसतो, त्या कुणी तरी वाचेल आणि आपल्या बद्दल त्या व्यक्तीला आपल्या बद्दल  सहानभूति वाटेल या आशेने. कींवा  ज्या व्यक्तीने आपल्याला खुप सुख दिले किंवा खुप दुःख दिले ती व्यक्ति ते वाचेल आणि त्याला काहीतरी फील होइल , आनंद किन्व्हा दुख ...whatever it is...... मात्र ज्या व्यक्तीने हे सगळ वाचाव ती व्यक्ति तर बर्याच  वेळेला ते वाचतच नाही , जग मात्र वाचतं आणि  स्वत:ची  करमणुक करून घेत असतं.

त्याचबरोबर या सगळ्या   साईटसचा  आजुन एक दुशपरिणाम  म्हणजे, कधी तरी आपण खुप आनंदात असतो आणि ऑरकुट वर मित्रांशी चैटिंग  करत मस्त बसलेलो आसतो. इतक्यात कुठल्या  तरी बिघडलेल्या मित्र मैत्रींणीचा   चा अपडेट , साईट वर अपडेट होतो, मग सहजच उत्सुकते पोटी  आपण  त्या व्यक्तीच्या प्रोफाइल मध्ये  जातो, मग थोडेशे  फ़ोटो  बघीतले  जातात, आणि मग कळतं  अरे च्यामायला  ही/हा खुपच सुखात आहे की. म्हणजे आपल्या बरोबर हा असा वागला , तसा वागला, आपण ते अजुन विसरलो नहीं आणि हा..., ती मैत्री आठवली की अजुन सुधा तुमच्या मानत खरोखरीच गलबल्त्न, पण ती जुनी मैत्री ही त्या व्यक्ती साठी  तितकीच महत्वाची असेल अस काही नाही. आणि मग उगाचंच त्या व्यक्तीच्या सुखात आपण  आपल्या कलिष्ट विचारांची  फोडणी  देत बसतो. 

हयात अश्या सोशल नेटवर्किंग साइट्सना  दोष देणे  हा उद्देश्य नाही, वास्तविक ह्या साइट्स ह्या आज आमच्या पिढीच्या रोजच्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहेत  आणि रोज कामानिमित्त , कर्मणूकी साठी, ह्या साइट्सच्या नावाप्रमाणे
सोशल नेटवर्किंग साठी रोजच आम्ही ह्या साइट्स वापरतच  असतो.  फक्त ह्या साइट्स वापरत असताना आपण  आपल्या किती भावना उघड्या करतोय किन्व्हा इतरांच्या भवनान मधे किती गुन्तोय याचा विचार नक्कीच  व्हावा .

पण अर्थात स्वभावाला अवशध नसतं  , आणि शेवटी मज्याशी कोणीही कसा ही वागला तरी मला काहीच फरक पडत नाही आणि मी त्या व्यक्तीला सदिछाच देइन असं वागायला आपण काही महापुरुष नसतो.