Friday, December 12, 2008

भाग १

26/11/2008 रात्रीची १०:१५ ची वेळ। पार्ल्याच्या हनुमान रोड च्या बस स्टाप वर उतरून चालत तीन मिनिटांच्या अंतरावर अस्नायरा माज्या रूम वर येउन मी नुकताच बसलो होतो। माज्या शिफ्ट च्या ड्यूट्या त्यामुले बर्याच दिवसानी भेटलेल्या मित्राशी गप्पा मारत बसलो होतो , तेवढ्यात कांठळ्या बसवणारा प्रचंड आवाज जाला , संपूर्ण बिल्डिंग हादरली, प्रचंड किनकाळी, जे काही उडून पडलं त्याचे तुकडे अगदी खिडकित येउन पडले .......सगल शांत , भयाण शांत आणि पुन्हा एकदा आवाजाची गर्दी ...." आहो काय जालं , पहा न टी व्ही वर काय दाखवत आहेत , सी एस टी ला फायरिंग जालं म्हणे , हाउ होर्रिबल, पण हा कसला आवाज होता, नक्कीच ब्लास्ट चा, पण कुठे , एअरपोर्ट ...बापरे॥ नक्कीच जवळ जाला आहे....आहो काकू समीर आजुन घरी नही आला ...शी नस्त टेंशन...

सगळ्या बिल्द्डिंग मधून भराभर लोकंबाहेर आली। पोलिसानच्या गाड्यांचे सायरन घुमायला लागले । सगळी कड़े पोली सानच्या आणि एंबुलेंस च्या लाल आणि निळ्या दिव्यांच्या प्रकाशाची दिवाळी आणि आम्ही राहत होतो तिथून काहीच मिनिटांच्या अंतरावर आमच्याच इतक्या साध्या आणि निष्पाप लोकांच्या रक्ताची होळी

मन विशिन्न करुन टाकणारा हा प्रसंग इतक्या जवळून मी पहिला , नव्हे तर कही मिनिटां पूर्वी मी तिथेच होतो , अगदी तिथेच ....काही वेळ ऑफिस मधे अजुन थांबून मी आताच तिथे उतरलो असतो तर....विचार करून अंगावर शहरा आला । मुंबई च्या लोकल गाडयां मधे पूर्वी ब्लास्ट जाले तेव्हा पुण्यात आम्हाला दहशतवाद आपल्या इतक्या जवळ आलाय याची जाणीव नक्कीच जाली होती पण आजच्या प्रकारानी मात्र त्याचा 'खरी' जाणीव करून दिली।

रात्र जगण्यात गेली। टी व्ही वरची एक एक दृश्य पाहून परिस्थित चिघलत चल्याचं दिसत होतंच। सकाळी उठून जिथे स्फोट जाला त्याच स्टाप वरून ऑफिस ला गेलो। ग्रैंड ह्यात्त ची सुरक्षा कड़क करण्यात आली होती। प्रचंड पोलिस, एंबुलेंस यानि होटल चा ताबा घेतला होता। होटल ची सिक्यूरिटी संपूर्ण सतर्क होतीच।

मोकले रस्ते, पोलिस , बंदुका अशी मुंबई किती भयाण वाटत होती।

बोलानार्यांचे दाखवायचे आणि खायचे दात दिसत होते। काही दिवसांपूर्वी मराठी च्या मुद्दया वरून आपली मराठी ताकद दाखवणारे

No comments: