Tuesday, December 28, 2010

Pune tithe kay une....

             संस्कृतिचं माहेरघर असणार्या पुण्याची पूर्ति लाज काढण्याच भाग्य आज राज्यकर्त्यांना लाभलं आणी त्या संधीचं त्यांनी अक्षरशः सोनं केल. छत्रपतीनचा आत्मा आज स्वर्गात सुखावला असेल. आणि त्याहून ,धन्याच्या बगेतला एक आम्बा न विचरता घेतला म्हणून स्वताहाला अपराधी समजणार्या आणी आपल्या कर्तुत्वाने त्या जाणत्या राजाचा गुरु होउन या स्वराज्यची नीव ज्यानी स्थापिली  त्या दादोजी कोंदेवांचा तर ऊर आज आनंदाने भरून आला असेल. ह्या साठीच तर छत्रपतीनी प्राणाची आहुति वाहून हे राष्ट्र निर्मिले.
               ह्या राज्यात स्त्रीयांचा बलात्कार करणे हेच पुरुशार्थाचे प्रतीक आहे. गरिबाना लुबाडणे,महागाई वाढवणे ह्या सारख्या प्रश्नांवर  जर सरकार लक्ष्य देत बसली तर दंगली कश्या करायच्या, कसाबची खातर काशी ठेवायची, अतिरेकी संघटनांना काही कमी तर पडत नाही ह्या कड़े लक्ष्य कोण देणार.
              दररोज पेपर उघडल्यावर बेशिष्त वहातुकी मुले  जीव गमावलेले लोक दिसतात, पुण्यात रिक्शे वल्यान्ची मनमानी दिसते, लैंगीक अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियाच नाही तर लहान लहान मुली सुधा.....कधी रस्त्यात चुकून सिग्नल मोडला तर आप्ल्याय इतकी हिडीस वागणूक मिळेल की जसा काही आपण मोठा गुन्हा केला आहे. पोलिसांची खाऊगिरी, रिक्शावाल्यांची मनमानी, प्रत्येक गल्लीतल्या दादाची दादागिरी आणि भाईची भाईगिरी. ह्या सगळ्या प्रश्नांपुढे खरच का ददोजिंचा पुतला हलवणे इतका गंभीर प्रश्न आहे.
                 पुन्हा एकदा माजा आज प्रश्न आहे राज ठाकरेना, पुतला हलवन्या विरुध आंदोलन करण्यापेक्षा आपण कांदा स्वस्त करण्यासाठी आंदोलन करू शकतो का? किंवा हिन्जवडी आय टी पार्क मधे काही दिवसां पूर्वी जे बलात्कार जाले त्या दोशिंच काय जाला हे आपण शोधून काढू शकतो का?
                 समाजात सन्मानानं जगण्याचा अधिकार छत्रपतींनी स्त्रयांना दिला होता. तो हक्क आणि ते स्वत्र्यंत आपण त्यांना परत मिल्वुन देऊ शकू का? या पवित्र भूमीत जिथे हौतात्म्यांचं रक्त या मातीत आज ही रोज मिसलतय त्या मातील थुंकणाय्रांना आपण ज्होंडपुन काढू शकतो का?
                    हे प्रश्न खरंतर खुपच छोटे आहेत आणि यात प्रोफिताबिलिटी पण आजिबात्च नाही. त्यामुले अर्थातच उत्तराची अपेक्षा नाही....................................!!!!!!! 

पुणे महानगर पलिकेतील गोंधळ (सोबत बातमी) 




 पुण्यात ‘सर्वपक्षीय’ तोडफोड
 पुणे, २७ डिसेंबर / प्रतिनिधी
पुण्यातील प्रसिद्ध लाल महालात असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे महापालिकेने आज पहाटे शेकडो पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हलविल्याने पुण्यात आज एकच हल्लकल्लोळ उडाला. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना-भाजप-मनसे यांनी महापालिका सभागृहात मानदंड आणि मानाच्या खुच्र्याची तोडफोड करीत तसेच अक्षरश: दिसेल त्या वस्तूची नासधूस करीत काढला.