Thursday, April 1, 2010

A friend called David


आपण सगळएच जण आपापल्या आयुष्यात भरपूर काही सहन करत असतो. मी पण टाइम एंड अगेन मला माझ्या  देवाने जे जे वाढून दीले ते आनंदाने ग्रहण केले. अर्थात मला बर्याच वेळा श्रीखंड पुरी, पुरणपोली, किन्व्हा फॉर द्याट  मैटर  मी शाकाहारी असल्याने सुरमई, पापलेट ची तुकडी किन्व्हा कोलंबि चा कलावण , असच काही काही वाढून मिळत राहिल आहे. आता रक्त शुद्ध ठेवायच  म्हणजे कधी तरी कारल्याची भाजी खाविच लागणार, आम्बट असलं  तरी लोणचं पानात पाहिजेच. झणझणीत  तर झणझणीत ठेचा हवाच .... दोडका , मुळ1 , आणि बूळबूलीत भेंडी सुद्धा हवीच... हेच परिपूर्ण भोजन आहे ... जे आपल्याला आरोग्य देत आणि आपली प्रतिकार शक्ति वाढवतं . तसच आपल्या जीवनरूपी ताटात  सुख दुखांच्या रुपाने हे सगले पदार्थ वाढलेले असतात. एकवेळ जेवणाच्या ताटातले  एखादे पदार्थ आपण सोडून उठू शकतो पण आयुष्याच्या ................ हे आयुष्यातले सगले जिन्नस आनंदानेच ग्रहण करावेच  लागतात.

तेव्हा मी सुधा माझ्या देवाने   मला दिलेल्या आयुष्यावर खुप खुश आहे, आणि कधी कुठल्याही गोष्टीची तक्रार  केली नाही, आणि त्याच्या मागचं एक कारण हे ही आहे ..... के मज़ा माझ्या  देवावर आणि स्वत:वर  विश्वास आहे. आलेली प्रत्येक  वेळ सरणार आहे अणि काळ बदलणार आहे हे सत्य मला माहीत आहे, त्यामुले मी नेहमीच समाधानी असतो.

मात्र गेल्या काही दिवसात मला एक गोष्टीचा अतिशय कंटाळ| आला आहे आणि मी देवाकडे प्रार्थना करतो की देवा आता बास. आणि ती गोष्ट म्हणजे मैत्री. मला काधीच चांगले मित्र मिळ|ले नाही किन्व्हा टाली कधी एक हाताने वाजत नाही तसं मी कधी चांगला मित्र होऊ शकलो नाही. सतत्याने  प्रयत्न करून ही मझे  मित्र फार टिकत नाहीत. मी एखाद्या मैत्रीमधे खुप गुंतून जातो, पण आणि कदाचीत म्हणूनच समोरच्याच्या परस्नल स्पेस मधे माझी  मैत्री इनटरफीयर करत असेल. किन्व्हा सातत्याने प्रयत्न हे मैत्रीत करावे लगत नाहीत. यात देखिल काही मेख असेल. पण ते काही असो, माझ्या   साठी मैत्री ही खुप महत्व ठेवते आणि प्रत्येक वेळला माझ्या  मैत्रीशी मै प्रमाणीक राहिलो आहे आणि तरीही मला या मार्गावर खुप दुखच मिळ|लं  आहे. पण म्हणून काही माझी मैत्री या संकल्पनेवरची श्रद्धा कमी होत नाही आणि प्रत्येक वेळेला मी तितकाच त्या भोवर्यात अडकत जातो. आणि म्हणुनच मी हल्ली देवाकडे प्रार्थना करत होतो की आता बास. मला अश्या लोकांशी भेटवुच नकोस ज्यांना मैत्री ची जाण नसेल, किन्व्हा मला हे तरी शिकव की मैत्री करून सुद्धा स्वार्थी कस रहिचं. (खरं तर सध्या मी पुण्यात आहे, त्यामुले स्वार्थी कस रहिचं हे शिकायला मला देवाची काही गरज नाही, रादर देवाला ते ट्रेनींग पुणं देऊ शकत) . मी विचार करत राहिलो की मला नेहमी असेच का भेटले.... का मैत्रीमध्ये आता जेन्यूनीटी राहिलीच  नाहीये ? लतादिदिंच पेज थ्री मधील कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे  हे गाण आता पेज थ्री पुरता मर्यादीत न रहता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण ते अनुभवत आहोत, आणि हा विचार करत असतानाच मला अचानक डेव्हीड़ आठवला आणि क्षणात जाणीव झाली की नाही नाही देवाने आपल्याला गरज होती तेव्हा खरच खुप चांगले मित्र दीले. काय झालं असतं जर त्या रात्री डेव्हीड़ नास्ता तर.

 मी अमेरिकेत असताना आम्ही फ्लूएनव्हाइड़नर च्या केनटकी  फ्राईड़ चिकन (के एफ सी ) साठी काम करत होतो. मी, अनिकेत, चिनार.मयूरा, ईक्राम हे या कथेतील मुख्या सूत्रधार. अनिकेत ...कॉलेज सोडून आज तीन वर्ष होत आली तरी आज ही अनिकेत बद्दल कोणाला सांगायचा झाला तर my extended sibling......असंच मी आज ही सांगतो. कधी त्याच्या बद्दल एखद्या नवख्या माणसाशी  देखिल बोलत असलो की तो व्यक्ति म्हणते yes i know him .. you had mentioned him last time we spoke....तेव्हा अनिकेत आणि मी एकाच घरात राहत होतो. एकदा शुक्रवारी रात्री के एफ सी मधे अतिशय गर्दी होती. चिनार आणि मयूरा ची सूटी होती , मी आणि इकराम समोर कैश वर तर अनिकेत काही ईंडोनएशीयन मुलांबरोबर कीचन मध्ये काम करत होता. सात सवासात च्या दरम्यान खाली मान घालून तो अचानक बाहेर आला. आणि काही न बोलता थेट बाहेर गेला. मी त्याला काम करता करताच what happned म्हणून विचरल पण काही न बोलता तो थेट बाहेर गेला. त्याचा उज्वा हात मात्र त्याने डाव्या हातात घट्ट पकडला होता.. ते मी पहिला आणि त्याच्या मागोमाग बेथ ही शिफ्ट मेनेजर सुद्धा
घाईघाईने बाहेर गेली. काही तरी गड़बड़ आहे हे मला काळलं होतं पण  बेथ आणी अनिकेत दोघं ही निघून गेल्यावर मी विचारणार कोणाला. तेवढ्यात कीचन मधला एक ईंडोनएशीयन मुलगा बाहेर आला आणि त्याने मला सांगीतल hey  nick your brother has met with an accident... he happned to put his hand into the fryer.. its burnt upto the elbow....
इतक्य पीक अवर ला हा अपघात झाला होता. ऑपरेशन चालू ठेवणं आवश्यक होतं तितकच आवश्यक होतं अनिकेत ला दवाखान्यात नेण . आणि मला त्याच्या बरोबर जायचं होतं. बेथ अनिकेतला घेउन कुठे गेली मला माहीत नव्हतं , आत मध्ये ती  ईंडोनएशीयन मुलं त्यांच्या स्थानीक भाषेत काही अपघाताविशयी  काही बोलत होती. समोरून ओर्ड़ेर्स पडत होत्या आणी मला काही सुचत नव्ह्त. मी गर्दीपासून तोंड फिरवल आणी डोळे पुसले. माझ्या बरोबर असणारा इकराम .. वास्तविक याचा आणि माझा कधी विशेष पटलं नाही. कारण तो काम करत नसे. आणी ज्यांना काम करायला आवडत नाही अश्या लोकांचा मला राग आहे. मात्र हां इकराम माझ्या जवाल आला आणि मला म्हणाला अरे निखिल तू कशाला कलजी करतो. आपण दोघ पटापट क्लोसिंग करू आणि मग तू सरळ चीरोकी इंडियन हॉस्पिटलला जा. आम्ही राहत होतो त्या गावातील सार्वजनीक  वाहतूक व्यवस्था रात्री बार वाजता बंद होत असे. तेव्हा इकराम असा म्हान्ल्यावर मला जरा बरं वाटल , साडे अकरा पर्यंत क्लोसिंग होईल दोघान्ने केलं तर. मी भराभर काम करत राहिलो. थोड्या वेळेत बेथ आली तीने मला अपघाताबद्दल म्हणाली ..dont worry, david has taken aniket to the hospital and he is going to call mee soon. रात्री दहा वाजता आम्ही स्टोर बंद केल. मी भराभर क्लोसिंग च्या तयारीला लागलो. सवा दहा झाले तरी ईक्राम दिसे ना म्हणून मी बेथ ला विचारलं तर ती म्हणाली ikram had some urgent work and has left for the day. मी चाटच पडलो. अश्या परीस्थीतीत संपूर्ण क्लोसिंग माझ्या एकट्यावर सोडून हा पलून गेला होता. वास्तविक  लोबी आणि कैश क्लोसिंग हे दोन जणामध्ये  सुद्धा होणारं काम नव्ह्त, ते तो माझ्या एक्त्यावर सोडून निघून गेला होता. मी डोळ्यातील आश्रू आवरत पुन्हा काम चालू केलं . इतक्यात डेव्हीड़ आला. मी काही विचरायच्या  आतच हात वर करत  तो म्हणाला ....nothing to worry everything is fine. hopital has relesed him and I have dropped him home. त्या नंतर डेव्हीड़ने मला क्लोसिंग मधे मदत केली. झालेल्या प्रकारामुले बेथ ला  खुपच फोल्लो अप करावे लागत होते, साडेबारा वाजून गेले तरी बेथ , मी आणि डेव्हीड़ क्लोसिंग करत होतो. नंतर बेथच कैश क्लोसिंग झाल्यावर तीने देखील आम्हाला मदत केली आणि साधारण रात्री दीडच्या सुमारास बेथ आणि डेव्हीड़ने मला त्यांच्या गाडीतून घरी सोडल.