स्वरमंचने आपला गीत रामयाणाचा ८७वा कार्यक्रम हनुमान जयंती निम्मित्त निगडी येथील श्री हनुमान मंदिर येथे प्रचंड गर्दीत मरुतिरायाच्या चरणी अर्पण केला. या कार्यक्रमानंतर गीत रामयाणाविषयीचे आमचे विचार, मराठी मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये असणारे गीत रामयणाचे महत्व या विषयावर देखिल मी बोललो. मराठी माणसाचं एक आहे,आपल्याला जर कोणी काही सांगत असेल तर ते तो ऐकून घेतो,आणि नंतर टाळ्या ही वाजवतो. उगाच नाही राज ठाकरेच्या भाषणाला आणि अनिरुद्ध बापूंच्या आश्रमात सारखीच गर्दी जमत.
असो, तर ८७वा कार्यक्रम केलेल्या स्वरमंचला आता वेध लागलेत शतकपुर्तीचे. आज गीत रामयाण म्हणावं तितकं काही पोप्युलर राहिलेलं नाही. पण मराठी माणसाला ग.दि. मा आणि बाबूजी यांनी दिलेला हा आमूलाग्र साठा मराठी-अमराठी, हिन्दू-मुसलमान,असल्या नामर्द लोकांनी चालवलेल्या देशद्रोहाच्या चीतेवर पेटून संपून जाऊ नये म्हणून स्वरमंच कार्यरत आहे.
गीत रामयण हे फक्त काव्य नाही की नुसतं संगीत नाही तर तो मराठी मनावर करण्यात (कोरण्यात) आलेला एक संस्कार आहे व तो लुप्त होत चालला आहे आणि प्रतेक मराठी माणसाने त्याचे जतन केले पाहिजे.
(स्वरमंचचे सर्वेसर्वा श्री हेरंब चिंचणीकर यांनी स्वरमंच चे पैलू अशी एक फुल ना फुलाची पाकळी तसे काव्य नाही पण कौतुक असे चार शब्द स्वरमंचच्या कलाकारंसाठी लिहिले व् माझ्या सुपूर्त केले. ते येथे प्रसिद्ध करत आहे, ८८ व्या कार्यक्रमात ते मी रसिकांसमोर सादर करीन.)
(स्वरमंचच्या ८७ व्या कार्यक्रमात गीत रामायण सादर करताना कु.शर्मीला चव्हाण, कु.मृणालिनी व् स्नेहा कुलकर्णी, सौ.दीपा
मलावणकर, श्री हेरंब चिंचणीकर व् निखिल राजे .
(केदार तळणीकर, सौ. उर्मिला भालेराव, सौ जयश्री लेंभे , कु. शर्मीला चव्हाण, कु मृणालिनी व् स्नेहा कुलकर्णी )